Posts

Showing posts from July, 2022

सबसॉयलर (Subsoiler) या अवजाराच्या माध्यमातून जमिनीचे संवर्धन….

Image
  सबसॉयलर (Subsoiler) या अवजाराच्या माध्यमातून जमिनीचे संवर्धन…. वर्षानुवर्ष जमिनीची मशागत एका विशिष्ट खोलीपर्यंत करीत राहिल्याने तिच्या खालील थर घट्ट बनतो. शेतामध्ये नांगराचा सलग व सतत काही वर्ष वापर केल्यास तसेच शेतीतील इतर कामांकरिता अवजड ट्रॅक्टर्स किंवा अवजड अवजारांचा सातत्याने वापर केल्यास जमिनीखाली कठीण थर निर्माण होतो त्यालाच hard pan असे म्हणले जाते. या तयार होणाऱ्या घट्ट थरामुळे जमिनीतील हवेचे प्रमाण कमी होते तसेच जमिनीत पाणी साठून राहते व पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होत नाही. पाणी मुरण्याच्या क्रियेत अडथळा निर्माण होतो म्हणून जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढते व जमिनीची धूप होते. या सर्वांचा परिणाम पिकाच्या उत्पादनावर होतो. त्या करिता नेहमीपेक्षा खोल नांगरट अधूनमधून (२ वर्ष तून एकदा करावे) केल्यास हा घट्ट थर मोकळा होतो व पाण्याचे शोषण जास्त प्रमाणात होते. त्यासाठी ‘सबसॉयलर’ ह्या अवजाराचा चांगला उपयोग होतो. दि. १०/०६/२२ या दिवशी गाव बेटमोगरा ता.मुखेड येथे Vibrating Subsoiler चे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले व शेतकऱ्याना मार्गदर्शन करण्यात आले. #farmer #...

लिंबू तोडनी यंत्राचा प्रभावी वापर…

Image
  लिंबू तोडनी यंत्राचा प्रभावी वापर… पारंपरिक पद्धतीमध्ये शेतकरी तारेचा आकडा करून लिंबू तोडणी करतात. लिंबू तोडणी करताना जमिनीवर पडल्यामुळे शेतकऱ्यांचे 20 टक्के लिंबू खराब होवुन आर्थिक नुकसान होते. तसेच माती, चिखल लागल्यामुळे लिंबू धुऊन मगच पोत्यांमध्ये भरावे लागतात. लिंबाच्या झाडांच्या काट्यांमुळे देखील शेतकऱ्यांना व शेतकरी महिलांना लिंबू तोडणीचा त्रास होतो. हा सर्व त्रास कमी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, सगरोळीं मार्फत आज दि. 10/6/2022 रोजी नागठाणा, तालुका उमरी येथील लिंबाच्या शेतकऱ्यांना लिंबू तोडनी यंत्राचे प्रशिक्षण देऊन प्रथम दर्शनी प्रात्यक्षिका अंतर्गत लिंबू तोडणी यंत्र देण्यात आले. या यंत्राच्या साहाय्याने लिंबू सहज तुटून जोडलेल्या पाईप मध्ये जमा होतात, जमिनीवर पडत नाहीत व नंतर शेतकरी सहज पोत्यात किंवा पिशवीत भरून पॅक करू शकतात. या मुळे शेतकऱ्यांचे लिंबाचे होणारे नुकसान होत नाही आणि त्रास देखील वाचतो. #fruit #kvk #sagroli #nanded #fruitsandvegetables #AcidLime #acidlime ?? #newtechnologies #citrus_fruits #kagzi_lime #lime #lemon #harvester #लिंबू_तो...

शहापूर येथे “सोयाबीन पिक परिसंवाद” संपन्न…

Image
 शहापूर येथे “सोयाबीन पिक परिसंवाद” संपन्न… या सोयाबीन पीक परिसंवादात सोयाबीन लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान ज्यात सोयाबीनची बीबीएफ व टोकण पद्धतीने लागवड, जमिनीच्या प्रकारानुसार व पाणी उपलब्धतेनुसार वाणाची निवड, बीज प्रक्रिया, माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन, एकात्मिक तण व्यवस्थापन व अल्प खर्चिक पद्धतीचा अवलंब करून कीड व रोग व्यवस्थापन यावर भर देण्यात आला. तसेच उपस्थित शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक देण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे व बेस्ट ऍग्रो लाईफची शास्त्रज्ञ श्री सारा नरसिंह व श्री नामदेव घुले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी शहापूर व परिसरातील 500 पेक्षा अधिक शेतकऱ्यांची उपस्थिती होते. दिनांक १० जून २०२२, शुक्रवार मौजे शहापूर तालुका देगलूर येथे बेस्ट ऍग्रो लाइफ लिमिटेड व कृषी विभाग तर्फे सोयाबीन पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. #farmers #farming #soybeanoil #soyabeanfarming #Soyabean_Oil #soyabean #kvk #sagroli #nanded #सोयाबीन ...

समूह प्रथमदर्शनी प्रात्यक्षिक सोयाबीन अंतर्गत शेतकऱ्यांना पेरणीपूर्व प्रशिक्षण व निविष्ठा पुरवठा…

Image
 समूह प्रथमदर्शनी प्रात्यक्षिक सोयाबीन अंतर्गत शेतकऱ्यांना पेरणीपूर्व प्रशिक्षण व निविष्ठा पुरवठा… संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी ता. बिलोली जि. नांदेड कडून राष्ट्रीय तेलबिया पिके अभियान खरीप 2022 अंतर्गत काठेवाडी ता. देगलूर येथील 20 हेक्टर क्षेत्रावर समूह प्रथमदर्शनी प्रात्यक्षिक सोयाबीनसाठी 50 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. या प्रात्यक्षिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे ज्यात प्रामुख्याने सुधारित वाण वापर केडीएस 726 फुले संगम, माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन ,बीबीएफ तंत्राने किंवा टोकण पद्धतीने सोयाबीन लागवड ,ट्रायकोडर्मा व एनपीके ची बीजप्रक्रिया ,एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनासाठी कामगंध सापळे,5% निंबोळी अर्काचा वापर, सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेट 2 चा वापर इत्यादी तंत्रज्ञान राबवण्यात येणार आहे व त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या. प्रात्यक्षिकासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे यांनी वरील निविष्ठा व तंत्रज...

प्रयोगा अंतर्गत शेतकऱ्यांना पेरणीपूर्व प्रशिक्षण आणि निविष्ठा वाटप करण्यात आल्या.

Image
प्रयोगा अंतर्गत शेतकऱ्यांना पेरणीपूर्व प्रशिक्षण आणि निविष्ठा वाटप करण्यात आल्या. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत  तुर पिकासाठी समुह प्रथमदर्शनी प्रात्याक्षिक प्रयोग तळणी व चिंचाळा ता. बिलोली या दोन गावात प्रत्येकी २५ शेतकरी याप्रमाणे ५० शेतकऱ्यांच्या शेतावर एकूण ५० एकर क्षेत्रावर राबविण्यात आला.  प्रयोगा अंतर्गत शेतकऱ्यांना पेरणीपूर्व प्रशिक्षण आणि  निविष्ठा वाटप करण्यात आल्या. पेरणीपूर्व प्रशिक्षणादरम्यान डॉ. कृष्णा अंभुरे यांनी शेतकऱ्यांना बीज उगवण तपासणी, बीजप्रकिया तसेच तूर उत्पादन तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणानंतर शेतकऱ्यांना प्रयोगासाठी आवश्यक असलेल्या निविष्ठा वाटप करण्यात आल्या त्यामध्ये वनामवि, परभणी यांनी नुकतेच विकसित केलेले गोदावरी हे वाण देण्यात आले तसेच बीजप्रक्रियेसाठी आवश्यक असलेली जैविक खते (रायझोबियम, पीएसबी आणि केएमबी) आणि ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक देण्यात आले. सदर प्रशिक्षणासाठी आणि निविष्ठा वाटप कार्यक्रमासाठी एकूण ५० शेतकरी उपस्थित होते.

ट्रॅक्टर चलित सबसाॅइलर चे प्रात्यक्षिक व नाविन्यपुर्ण शेती यांत्रिकीकरणाची सखोल माहितीव्हावी यासाठी भाडे तत्वावर कृषि अवजारे सेवा केंद्र (CHC) चालकांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते ….

Image
ट्रॅक्टर चलित सबसाॅइलर चे प्रात्यक्षिक व नाविन्यपुर्ण शेती यांत्रिकीकरणाची सखोल माहितीव्हावी यासाठी भाडे तत्वावर कृषि अवजारे सेवा केंद्र (CHC) चालकांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते …. याप्रशिक्षणा मध्ये शेती यांत्रिकीकरण व नाविन्यपुर्ण तंत्रज्ञानाची सखोल माहिती देऊन ट्रॅक्टर चलित सबसाॅइलर चे प्रात्यक्षिक करुन दाखवण्यात आले. प्रक्षेञ भेटीदरम्यान कृषी विज्ञान केंद्र सगरोळी अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या भाडे तत्वावरील कृषि अवजारे सेवा केंद्रास (CHC) भेट देऊन उपलब्ध असलेल्या अवजारांबद्दल माहित देण्यात आली. रुंद सरी वरंबा टोकण यंत्र (BBF Planter) ची हाताळणी संबंधी रोहीत अॅग्रो इंडस्ट्रीज चे श्री.पराक्रम टोम्पे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या बरोबरच प्रशिक्षणामध्ये किफयातशीर, नाविन्यपूर्ण आणि प्रगत कृषि यंत्रची कृषि अभियांत्रिकी विभागाच्या विषय विशेषज्ञ डाॅ.प्रियंका खोले यांनी सखोल माहिती व मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाचा ४० लाभार्थ्यांनी लाभ घेतला. कृषि विज्ञान केंद्र सगरोळी येथे दि.०६ व ०७ जुन रोजी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, कृषि विभाग आत्मा अंतर्गत ...