सबसॉयलर (Subsoiler) या अवजाराच्या माध्यमातून जमिनीचे संवर्धन….
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
सबसॉयलर (Subsoiler) या अवजाराच्या माध्यमातून जमिनीचे संवर्धन….
वर्षानुवर्ष जमिनीची मशागत एका विशिष्ट खोलीपर्यंत करीत राहिल्याने तिच्या
खालील थर घट्ट बनतो. शेतामध्ये नांगराचा सलग व सतत काही वर्ष वापर केल्यास
तसेच शेतीतील इतर कामांकरिता अवजड ट्रॅक्टर्स किंवा अवजड अवजारांचा
सातत्याने वापर केल्यास जमिनीखाली कठीण थर निर्माण होतो त्यालाच hard pan
असे म्हणले जाते. या तयार होणाऱ्या घट्ट थरामुळे जमिनीतील हवेचे प्रमाण कमी
होते तसेच जमिनीत पाणी साठून राहते व पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होत
नाही. पाणी मुरण्याच्या क्रियेत अडथळा निर्माण होतो म्हणून जमिनीवरून
वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढते व जमिनीची धूप होते. या सर्वांचा परिणाम
पिकाच्या उत्पादनावर होतो. त्या करिता नेहमीपेक्षा खोल नांगरट अधूनमधून (२
वर्ष तून एकदा करावे) केल्यास हा घट्ट थर मोकळा होतो व पाण्याचे शोषण जास्त
प्रमाणात होते. त्यासाठी ‘सबसॉयलर’ ह्या अवजाराचा चांगला उपयोग होतो. दि.
१०/०६/२२ या दिवशी गाव बेटमोगरा ता.मुखेड येथे Vibrating Subsoiler चे
प्रात्यक्षिक दाखवण्यात आले व शेतकऱ्याना मार्गदर्शन करण्यात आले. #farmer#Vibrating#Subsoiler#deep_tillage#subsoilingmachine#moisture_conservation_technique#water#soil#prévention#hard_pan#machine#machinery#water_stagnation#save_motioure#deep#plough#single#tyne_subsoiler#vibrosubsoiler#kvk#sagroli#nanded#अवजार#अवजारे#खोल_नांगरट#सबसॉयलर#save
समूह प्रथमदर्शनी प्रात्यक्षिक सोयाबीन अंतर्गत शेतकऱ्यांना पेरणीपूर्व प्रशिक्षण व निविष्ठा पुरवठा… संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी ता. बिलोली जि. नांदेड कडून राष्ट्रीय तेलबिया पिके अभियान खरीप 2022 अंतर्गत काठेवाडी ता. देगलूर येथील 20 हेक्टर क्षेत्रावर समूह प्रथमदर्शनी प्रात्यक्षिक सोयाबीनसाठी 50 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. या प्रात्यक्षिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे ज्यात प्रामुख्याने सुधारित वाण वापर केडीएस 726 फुले संगम, माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन ,बीबीएफ तंत्राने किंवा टोकण पद्धतीने सोयाबीन लागवड ,ट्रायकोडर्मा व एनपीके ची बीजप्रक्रिया ,एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनासाठी कामगंध सापळे,5% निंबोळी अर्काचा वापर, सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेट 2 चा वापर इत्यादी तंत्रज्ञान राबवण्यात येणार आहे व त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या. प्रात्यक्षिकासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे यांनी वरील निविष्ठा व तंत्रज...
लिंबू तोडनी यंत्राचा प्रभावी वापर… पारंपरिक पद्धतीमध्ये शेतकरी तारेचा आकडा करून लिंबू तोडणी करतात. लिंबू तोडणी करताना जमिनीवर पडल्यामुळे शेतकऱ्यांचे 20 टक्के लिंबू खराब होवुन आर्थिक नुकसान होते. तसेच माती, चिखल लागल्यामुळे लिंबू धुऊन मगच पोत्यांमध्ये भरावे लागतात. लिंबाच्या झाडांच्या काट्यांमुळे देखील शेतकऱ्यांना व शेतकरी महिलांना लिंबू तोडणीचा त्रास होतो. हा सर्व त्रास कमी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, सगरोळीं मार्फत आज दि. 10/6/2022 रोजी नागठाणा, तालुका उमरी येथील लिंबाच्या शेतकऱ्यांना लिंबू तोडनी यंत्राचे प्रशिक्षण देऊन प्रथम दर्शनी प्रात्यक्षिका अंतर्गत लिंबू तोडणी यंत्र देण्यात आले. या यंत्राच्या साहाय्याने लिंबू सहज तुटून जोडलेल्या पाईप मध्ये जमा होतात, जमिनीवर पडत नाहीत व नंतर शेतकरी सहज पोत्यात किंवा पिशवीत भरून पॅक करू शकतात. या मुळे शेतकऱ्यांचे लिंबाचे होणारे नुकसान होत नाही आणि त्रास देखील वाचतो. #fruit #kvk #sagroli #nanded #fruitsandvegetables #AcidLime #acidlime ?? #newtechnologies #citrus_fruits #kagzi_lime #lime #lemon #harvester #लिंबू_तो...
Comments
Post a Comment